नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबवा, नागपूर खंडपीठाचे सायबर सेलला आदेश

नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबवा, नागपूर खंडपीठाचे सायबर सेलला आदेश

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा,
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सायबर विभागाला दिला व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले.नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असं न्यायालयाने सायबर सेलला सांगितलं आहे.

ऑनलाईन मांज्या विक्रीसंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन मांज्या विक्रीचे प्रकार वाढले आहे. मांजामुळे होणारे नुकसान पाहता, त्याची विक्री थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजन करा व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करा, असे आदेशच नागपूर खंडपीठाने सायबर पोलिसांना दिले आहेत.

फोर्समध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक आदींचा समावेश आहे. याशिवाय, ग्रामपंचायतस्तरावर तलाठ्याच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.ऑनलाईन मांज्या विक्री थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश न्यायालयाने सायबर पोलिसांना दिले आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजा प्रतिबंधाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com