अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक प्रकरण; आरोपींवर एफआयआर दाखल

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक प्रकरण; आरोपींवर एफआयआर दाखल

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीत 27 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली पोलीस स्टेशनची नासधूस, पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक, पोलीस व्हॅनसह दुचाकी देखील फोडण्यात आल्या. नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील यती नरसिंह आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून FIR लिहिण्यास उशीर झाल्याने जमाव आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता दगडफेक, पोलिसांना मारहाण करणे, पोलीस ठाण्याची तोडफोड करणे,पोलीस व्हॅन फोडणे प्रकरणी पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 1200 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 26 लोकांची ओळख पटली असूनगंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपी फरार असून सध्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com