कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्यमंत्र्यांचं सूचक विधान; म्हणाले...
कोरोनाने ( corona) जगभरात हाहाकार माजवला होता. त्यानंतर सर्व नियंत्रित झाल्यावर मास्कमुक्ती आणि सर्व निर्बंध हटवण्यात आले.
आता मात्र पुन्हा एकदा कोरोना (corona) डोकं वर काढतोय कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे (rajesh tope ) म्हणाले आहेत. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे.
“आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाश्चात्य देश, युरोप, चीनमध्ये असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली, काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत, तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचं टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल”,
महाराष्ट्रात (maharashtra) एकूण 135 केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये 85 केसेस आहेत. महाराष्ट्राने 60 हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अतिशय नियंत्रित आहे. घाबरण्याचं कारण नाही असे राजेश टोपेंनी सांगितले.