Ratan Tata Passed Away : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Ratan Tata Passed Away : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर रतन टाटा यांनी ट्विटवरुन त्यांची प्रकृती चांगली आहे असं सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com