राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष?

राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष?

राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष? करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वात कमी दर मिळत आहे.
Published on

संदीप भुजबळ, मुंबई | राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष? करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वात कमी दर मिळत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत प्रतिलीटर 5 ते 10 रुपये दर कमी मिळत आहे. सध्या राज्यात सरासरी दूध खरेदी दर 27 रुपये लीटर आहे. राज्यातले गोकुळ आणि वारणा हे 2 सहकारी दूध संघ अपवाद आहेत. त्यांचा खरेदी दर प्रतिलीटर 32 रुपये इतका आहे.

कर्नाटकात 35 रुपये तर गुजरातमध्ये 37 रुपये दर इतके आहे. 6-7 महिन्यांपासून सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांची किमान 35 रुपये प्रतीलीटर हमीभावाची मागणी आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील खबरबात त्यांच्या समस्या लोकशाही मराठीवर सांगणार.

देशातल्या आघाडीच्या दूध उत्पादक राज्यातल्या प्रतिलिटर खरेदी दरापेक्षा राज्यात मिळतोय. प्रतिलिटर तब्बल 5 ते 9 रुपये कमी दर आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून सरकारच अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. शेजारच्या कर्नाटकमध्ये 32 ते 34 रुपये दर आहे. आंध्र प्रदेशात 36 ते-38 रुपये दर आहे. तेलंगणा आणि गुजरातमध्ये 34 रुपये, केरळ -पंजाबमध्ये दुधाला तब्बल 39-40 रुपये लिटर भाव आहे.

देशातल्या प्रमुख राज्यात यंदाचा गाईच्या दुधाचा प्रतिलिटर खरेदी दर

केरळ 40-41 रु.

पंजाब 39-40 रु.

आंध्र प्रदेश 37-38 रु.

तेलंगणा -35-38 रु.

आसाम 38 रु.

गुजरात 36-37 रु.

पश्चिम बंगाल 36-37 रु.

हरियाणा 34-35 रु.

बिहार 35 रु.

कर्नाटक 35 रु.

उत्तर प्रदेश 32-33 रु.

तामिळनाडू 32-33 रु.

महाराष्ट्र 27-28 रु.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com