राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली लक्ष्मण हाके यांची भेट; पंकजा मुंडे  म्हणाल्या...

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली लक्ष्मण हाके यांची भेट; पंकजा मुंडे म्हणाल्या...

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्रीत जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com