ST Strike : एसटी आंदोलकांचे आता CSMT स्थानकात ठिय्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘सिल्व्हर ओक’वर ( Silver Oak) एसटी कर्मचाऱ्यांनी (st strike) शुक्रवारी हल्ला केला. या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर कलम ३५३, १२० (ब) क्रिमिनल अबेटमेंट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना अटक, चार तास मेडिकल
खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.
काल सदावर्ते यांनी म्हटलं होतं की, कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले.