st bus
st busteam lokshahi

Video : St Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा सुटणार, हायकोर्टाचा ST कामगारांना हा आदेश

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा (st worker strike) तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. तर, दुसरीकडे 15 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात (mumbai high court) दिली. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही. तसेच पुन्हा असे वर्तवणूक केले जाऊ नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असेही हाय कोर्टने निर्देश दिले आहेत.

22 एप्रिलपर्यंत जे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे निर्देशहाय कोर्टने दिले आहेत. तसेच कुठल्याही कामगारावर कारवाई नको, असंही त्यांनी आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचेही आदेश दिले आहेत. कोविडचा भत्ता देण्याचेही स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रत्येक डेपोला ९५ लाख कोविड भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत लिखित आदेश वाचू, कारण सरकारवर आमचा विश्वास नाहीये. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com