ताज्या बातम्या
एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय स्थगित; 'या' मागण्या झाल्या मान्य
एसटी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
एसटी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला होता. एसटी संघटनेकडून विविध मागण्यासाठी सोमवार 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरु केले होते. मागण्या मान्य न झाल्यास 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात काम बंद करण्याचा इशारा देण्यात आल्या होत्या.
मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय स्थगित झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34 टक्क्यांवरून 41 टक्के देण्यात येणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची जी थकबाकी आहे, त्यासंदर्भात 15 दिवसांत निर्णय घेतला जाईल असे. मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.