आंदोलन चिघळले असतांना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंदोलन चिघळले असतांना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘सिल्व्हर ओक’वर ( Silver Oak) एसटी कर्मचाऱ्यांनी (st strike) शुक्रवारी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांची कारवाई रात्रभर सुरु होती. दुसरीकडे सायन रुग्णालयामध्ये (Sion Hospital Mumbai) एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महेश लोले (Mahesh Lole) असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. लोले हे एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

आंदोलन चिघळले असतांना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
रात्रभर पोलिस आक्रमक : पवारांच्या घरावर हल्ला ते सदावर्तेंना अटक अन् आझाद मैदानावर कारवाई

शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर संप चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यानंतर आंदोलकांवर कारवाई व अटक सत्र सुरु झाले. दरम्यान, लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com