दहावीच्या परीक्षेत मोठा बदल;  'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दहावीच्या गणित, विज्ञान या विषयासाठी पुढील वर्षी नवीन नियम करण्यात येणार आहे. गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

100 गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुणांची गरज असते मात्र आता 35 ऐवजी 20 गुणांची गुणांची गरज असणार आहे. 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात हा बदल नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर अंमलात येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली असून असे गुण मिळवून जे उत्तीर्ण होतील. त्यांच्या मार्कशीटमध्ये एक नोटदेखील असणार आहे ज्यात ते पुढे गणित किंवा विज्ञानाचा अभ्यास करू शकत नाहीत, असे लिहिलेले असेल. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com