Sri Lanka Emergency
Sri Lanka Emergencyteam lokshahi

Sri Lanka Crisis : लंकेत आणीबाणी वगैरे सगळं ठिकाय, पण ही वेळ का आली? जाणून घ्या 5 मुद्दे

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

कोलंबो : संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्राध्यक्ष मालदीवमध्ये पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आंदोलकांनी पंतप्रधानां राजीनामा देण्याची मागणी केली आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाबद्दल सरकारच्या विरोधात अनेक महिन्यांपासून निदर्शनं सुरु आहेत. आंदोलकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. या सर्व घटना घडत असताना अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की, कधीकाळी सोन्याची असलेली लंका आज एवढ्या भीषण आर्थिक संकटातून का जात असेल.

१. अर्थव्यवस्थेचं काय झालं?

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या 'पर्यटन क्षेत्राला' 2019 मध्ये चर्च आणि हॉटेल्सवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे सर्वात मोठा फटका बसला. त्या धक्क्यातून सावरण्याची संधीही श्रीलंकेला मिळाली नाही, तोच कोरोना महामारीची मोठी साध जगभरात निर्माण झाली. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या श्रीलंकेवर याचे गंभीर परिणाम झाले. याकाळात सरकारने कर कपात केली. त्यामुळे सरकारी तिजोरी आणखी कमी झाली. औषध, अन्न आणि इंधनापर्यंत सर्व काही आयात करण्यासाठी आवश्यक असलेलं श्रीलंकेकडील विदेशी चलन संपलं.

२. याचा सामान्य लोकांवर कसा परिणाम झाला आहे?

रशिया आणि इतरांना सवलतीच्या दरात तेलासाठी विनंती करूनही श्रीलंकेला अनेक महिने औषधं, अन्न आणि विजेचा तुटवडा सहन करावा लागला. तसंच पेट्रोल आणि डिझेलही संपलं. महागाईचा दर झिम्बाब्वेच्या तुलनेत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता महागाई आणखी वाढली तर बहुतांश लोकांना मुलभूत वस्तू खरेदी करता येणार नाहीत. श्रीलंका एका भयानक मानवी संकटाचा सामना करत असून, लाखो लोकांना मदतीची गरज आहे असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाने म्हटलं आहे. देशात निर्माण झालेल्या अन्नाच्या टंचाईमुळे तीन चतुर्थांश लोकसंख्येनं अन्न सेवन कमी केल्याचं भयावह वास्तव संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीमधून समोर आलं आहे.

३. राजपक्षे कोण आहेत?

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, 2019 पासून देशाचे प्रमुख, तसंच 22 दशलक्ष लोकसंख्येच्या देशातील राजकारणावर वर्षानुवर्ष वर्चस्व गाजवणाऱ्या राजपक्षे कुळातील फक्त एक सदस्य आहेत. 76 वर्षीय भाऊ महिंदा हे 2015 पर्यंत एका दशकासाठी राष्ट्रपती होते. 2009 मध्ये श्रीलंकेच्या दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धाचा रक्तरंजित शेवट त्यांनी पाहिला आहे.

महिंदांच्या नेतृत्वाखाली, श्रीलंका चीनच्या जवळ गेला आणि चीनला क्रिकेट स्टेडियम आणि विमानतळ तसेच समुद्रातील बंदरं भाड्यानं देऊन व्हॅनिटी प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्सचं कर्ज घेतलं.

४. राजपक्षे यांनी संकट निवारणासाठी काय केलं?

अनेक महिन्यांच्या निदर्शनांनंतर, राजपक्षे यांच्या निष्ठावंत भडकले. यावेळी झालेल्या संघर्षामध्ये देशव्यापी हिंसाचार झाला. यामध्ये किमान नऊ जण ठार झाले तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची घरं जाळण्यात आली. महिंदा यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यांच्या निवासस्थानातून सुरक्षा दलांच्या मदतीनं ते बाहेर पडले. परंतु गोटाबाया यांनी त्यांच्या जागी ज्येष्ठ राजकारणी रानिल विक्रमसिंघे (73) यांची नियुक्ती केली.

विक्रमसिंघे यांना आपत्ती निवारणासाठी प्रयत्न करण्यासाठी फार काळ न मिळाल्यानं त्यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. गेल्या आठवड्यात निदर्शकांनी त्यांचंही घर जाळलं होतं. यावेळी ते घरात नव्हते. आंदोलकांनी त्यांनाही राजीनामा मागितला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष राजपक्षे बुधवारी श्रीलंकेतून मालदीवला पळून गेले.

Sri Lanka Emergency
शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय बदलला, आता नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून

५. पुढे काय काय?

राजपक्षे यांनी देशात कायदा व सुव्यस्था कायम राहावी यासाठी राजीनामा दिल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. मात्र त्यांनी तशी कुठलीही औपचारिक घोषणा केली नाही. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला.

राजपक्षे यांनी बुधवारी विक्रमसिंघे यांना त्यांच्या अनुपस्थितीत हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. राजपक्षे पायउतार झाल्यानंतर एका महिन्याच्या आत संसदेत मतदानाद्वारे उत्तराधिकारी निवडणं आवश्यक आहे. परंतु स्पीकरने एका आठवड्यात नवीन नेता देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच, हे अस्पष्ट आहे की राजपक्षे यांना उत्तर देण्यासाठी कोणाला पुरेसं समर्थन मिळू शकेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com