SpiceJet विमान 23 हजार फुटावर असताना तुटलं विंड शिल्ड; मुंबईत एमर्जन्सी लँडींग

SpiceJet विमान 23 हजार फुटावर असताना तुटलं विंड शिल्ड; मुंबईत एमर्जन्सी लँडींग

SpiceJet विमानासोबत घडलेली ही दुसरी घटना आहे.
Published by :
Published on

स्पाईस जेट विमानाच्या विंडशील्डला तडा गेल्याने विमानाचं एमर्जन्सी लँडींग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. एअरलाइन्सने सांगितलं की, गुजरातमधील कांडला येथून उड्डाण घेतल्यानंतर विमानाच्या विंड शील्डमध्ये क्रॅक आला. त्यानंतर विमान मुंबईत उतरवण्यात आलं. स्पाइसजेटच्या विमानासोबत घडलेली ही दिवसभरातील दुसरी घटना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्पाईसजेटचं कांडला-मुंबई विमान 23,000 फूट उंचीवर असताना विंडशील्डचा भाग तुटला आणि त्यामुळे विमान उतरवावं लागलं. (SpiceJet plane windshield break emergency landing in Mumbai)

SpiceJet विमान 23 हजार फुटावर असताना तुटलं विंड शिल्ड; मुंबईत एमर्जन्सी लँडींग
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटचे कराचीत लँडिंग, हे आहे कारण...

स्पाईस जेट कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. "स्पाईसजेटचं Q-400 विमान हवेत असतानाच विंडशील्डमध्ये क्रॅक आल्याचं पायटला लक्षात आलं. त्यानंतर विमान तातडीने मुंबईत उतरवण्यात आलं." DGCA अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, "23,000 फूट उंचीवर उड्डाण करताना, P2 बाजूचे विंडशील्डचे आऊटरपेन फुटले. त्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान उतरवण्यात आलं. यावेळी सुरक्षितपणे विमानाचं लँडींग करण्यात आलं."

दरम्यान, आज सकाळी स्पाइसजेटच्या विमानात अचानक खराबी आल्यानं ते कराचीला वळवावं लागलं होतं. एसजी-11 हे विमान दिल्लीहून दुबईला जात होतं. मात्र बिघाडामुळे ते पाकिस्तानकडे वळवावं लागलं. विमानाच्या इंडिकेटर लाइटमध्ये काही खराबी आल्याचं सांगण्यात आलं आहे. स्पाइसजेटचं विमान कराचीत उतरल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र हे इमर्जन्सी लँडिंग नव्हतं, फ्लाइट सामान्य पद्धतीने लँड करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर दुसरं विमान कराचीला पाठवण्यात आलं, त्यानंतर प्रवासी दुबईला रवाना होतील असं कंपनीनं सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com