Mumbai Train Mega Block: मध्य रेल्वेच्या 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर विशेष मेगा ब्लॉक; वाचा सविस्तर माहिती
Mumbai Train Mega Block Update : मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मध्ये रेल्वेच्या ठाणे स्थानकात ६३ तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ३६ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष ब्लॉक दरम्यान प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. ३० मे आणि ३१ मे आणि ३१ मे च्या मध्यरात्रीपासून ते २ जून दुपारपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
६३ तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचं काम करण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ३६ तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान फलाट क्रमांक १० आणि ११ वर २४ डब्यांच्या गाड्या थांबण्यासाठी फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे.
ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर ६३ तासांचा विशेष ब्लॉक असेल. ३० व ३१ मे च्या मध्यरात्री १२.३० पासून २ जून दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील ३६ तासांचा ब्लॉक ३१/१ च्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार आहे, जो २ जून दुपारी १२.३० पर्यंत असेल. या दरम्यान ९३० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी १६१ गाड्या, शनिवारी ५३४ गाड्या, रविवारी २३५ गाड्या रद्द, तर ४४४ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. तसच ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट केल्या जाणार आहेत. विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मध्य रेल्वेनं दिलं आहे. विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवास टाळणे तसेच अत्यावश्यक असल्यास प्रवास करण्याचं आवाहन रेल्वेनं प्रवाशांना केलं आहे.