दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा 'या' दिवशी राहणार बंद

दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याची माहिती दिली आहे.

यामध्ये बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा या भागाचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com