Women Reservation Bill: राजीव गांधींचा उल्लेख करत सोनिया गांधी झाल्या भावूक
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नव्या लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आज चर्चा सुरू झाली आहे. आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते या विधेयकावर चर्चा करणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
सोनिया गांधी म्हणाल्या की, महिला आरक्षण हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते. नंतर ते पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने मंजूर केले. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.