Sonia Gandhi Ed Enquiry : सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी; देशभरात काँग्रेस नेत्यांची निदर्शने

Sonia Gandhi Ed Enquiry : सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी; देशभरात काँग्रेस नेत्यांची निदर्शने

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) ED मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. ही चौकशी आज संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) ED मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. ही चौकशी आज संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी 21 जुलै रोजी EDने सोनियांची सुमारे 3 तास चौकशी केली होती. सोनिया गांधी यांच्यासह चौकशी दरम्यान प्रियंका गांधी-वाड्रादेखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान सोनिया गांधी यांच्या प्रश्नाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आंदोलन करणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते राजघाटावर जाऊन मूक आंदोलन करणार आहेत. सोमवारी काँग्रेस कार्यालयात निदर्शने करण्यासंदर्भात काँग्रेस हायकमांडसह सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी यांनी याबाबत रणनीती आखली होती.

Sonia Gandhi Ed Enquiry : सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी; देशभरात काँग्रेस नेत्यांची निदर्शने
Pune : स्मशानभूमीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात तोट्यात चाललेल्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची फसवणूक केल्याबद्दल याचिका दाखल केली होती. आरोपानुसार, या काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच YIL नावाची संघटना स्थापन केली आणि त्याद्वारे नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणजेच AJL या संस्थेला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले.

Sonia Gandhi Ed Enquiry : सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी; देशभरात काँग्रेस नेत्यांची निदर्शने
Mumbai Local : CSMT स्थानकात लोकल बफरला धडकली, हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत

2000 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 50 लाख रुपयांना खरेदी केल्याप्रकरणी स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि या प्रकरणात गुंतलेल्या काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याची मागणी केली होती. याप्रकरणी जून 2014 मध्ये न्यायालयाने सोनिया, राहुल आणि अन्य आरोपींविरोधात समन्स जारी केले होते. ऑगस्ट 2014 मध्ये, ED ने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. डिसेंबर 2015 मध्ये दिल्लीच्या पटियाला कोर्टाने सोनिया, राहुलसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com