सोनिया आणि राहुल गांधींना ED चा समन्स
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald) सक्तवसुली संचलनालयानं (ED) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स बजावलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयानं २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र आता ईडीनं गांधी मायलेकांना समन्स पाठवलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा न घाबरता सामना करणार असून, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असे सिंघवी यांनी सांगितले. हे प्रकरण 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केले होते.
काय आहे प्रकरण?
'द असोसिएटेड जर्नल लिमिटेड' या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले 'नॅशनल हेरॉल्ड' हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या 'यंग इंडिया' कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने 'नॅशनल हेराल्ड'ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. 'द असोसिएटेड जर्नल'ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.