LIC Jeevan Umang Policy|Life Insurance
LIC Jeevan Umang Policy|Life Insuranceteam lokshahi

या IPO मधून मिळणार बंपर रिटर्न देणारा

काही आयपीओमधून तुम्हाला लखपती होता येते तर काही आयपीओतून कंगालही होता. गेल्या काही महिन्यात आलेले पेटीएम आणि एलआयसीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

काही आयपीओमधून तुम्हाला लखपती होता येते तर काही आयपीओतून कंगालही होता. गेल्या काही महिन्यात आलेले पेटीएम आणि एलआयसीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे. असाच एका आयपीओची माहिती तुम्हाला देणार आहे. ज्यात गेल्यावर्षी एक लाख रुपये गुंतविले असते तर आज झाले असते 70 लाख 58 हजार 823 रुपये!

विश्वास बसत नाहीये ना? पण अनेकांना असे वर्षभरातच मालामाल करून देणारा हा शेअर आहे EKI एनर्जी सर्व्हिसेसचा. जर एखाद्याने तो आजपर्यंत होल्ड न करता जानेवारी 2022 मध्येच ऑल टाईम हाय प्राईजच्या पातळीवर विकला असता, तर त्याच्या एक लाखांचे अवघ्या 9 महिन्यातच झाले असते एक कोटी 23 लाख 52 हजार 940₹!

(परताव्याचा हिशेब हा 102 रुपये IPO इश्यू प्राईस गृहीत धरून केलेला आहे)

• EKI एनर्जी सर्व्हिसेसचा IPO गेल्यावर्षी आला होता. 102 रुपये इश्यू प्राईज असलेला हा शेअर मार्चमध्ये लिस्ट झाला 140 रुपयांना... 12,599.95 रुपये अशी ऑल टाइम हाय पातळी गाठून आज आहे 7,200 रुपयांवर... म्हणजे तब्बल 6,900% रिटर्न्स!

• 102 इश्यू प्राईज व 140 लिस्टिंग प्राईज असलेला हा शेअर जानेवारी 2022 मध्ये 12,599.95 रुपये या ऑल टाइम हाय पातळीवर होता. त्यानंतर त्यात जबरदस्त विक्रीचा मारा म्हणजे प्रॉफिट बुकिंग सुरू झाले. त्यानंतर हा शेअर 5,450 पर्यंत खाली घसरला. परंतु त्याही पातळीवरून सहा महिन्यात 32%ने वधारून 7,200 च्या पातळीवर आज पोहोचला आहे. आयुष्यात एकदाच असा झूम झूम रॉकेट IPO खात्यात आला तर लाखाचे कोटी व्हायला वेळ लागत नाही. ज्यांना हा परतावा लाभला, ते खरोखरच नशीबवान!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com