सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकचा दावा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकचा दावा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत,
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं ट्विट केलं आहे.

बसवराज बोम्मई ट्विट करुन म्हणाले की, महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे. असे त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं बोम्मई यांनी म्हटले आहे.

सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकचा दावा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा
४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com