Pankaj Udhas: गायक पंकज उदास यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन
लोकप्रिय गझल गायक पंकज उदास यांचे निधन झाले. 'चिठ्ठी आयी हैं' हे त्यांचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
पंकज उधास यांचा 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्या बाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या मुलीने ही माहिती दिली.
भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उधास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.