Sidhu Moosewala
Sidhu MoosewalaTeam Lokshahi

सिद्धू मुसेवालापासून ते Tupac पर्यंत...जगातल्या 5 बड्या रॅपर्सची झालीये गोळ्या घालून हत्या

Sidhu Moosewala यांच्या हत्येमुळे रॅपर्स लोकांच्या हत्येचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Published by :
Sudhir Kakde
Published on

हातात अद्ययावत अशा रायफली, पिस्तूलं, आजूबाजूला आलीशान गाड्या अन् हिप-हॉप स्टाईलचे गाणे गाणारा सिद्धू मुसेवाला अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेला होता. काल अचानक त्याची हत्या झाली आणि राजकीय वर्तुळासह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र जगभरातील रॅप इंडस्ट्रीमधील स्टार्सची बंदुकीनं गोळ्या हत्या होणं काही नवीन नाही. आता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काल आपल्या मित्रांसह आपल्या घरी जात असलेल्या सिद्धू मुसेवाला यांचं वाहन काही हल्लेखोरांनी अडवलं आणि वाहनातून उतरून काही क्षणांत सिद्धू मुसेवाला यांच्या चारचाकी वाहनावर जोरदार गोळीबार सुरु केला. काही मिनिटांमध्ये सिद्धू मुसेवाला यांच्या वाहनासह त्यांच्या शरीराची सुद्धा चाळण हल्लेखोरांच्या गोळ्यांनी केली. या घटनेनं पंजाब आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय. मात्र आजवर अशा अनेक रॅपर्सची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अशाच काही घटनांचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. (Sidhu Moosewala Shot Dead)

सिद्धू मुसेवाला

Sidhu Moosewala
Sidhu MoosewalaTeam Lokshahi

प्रसिद्ध पंजाबी हिप-हॉप स्टाईलने गाणं गाणारा गायक सिद्धू मुसेवाला याची त्याच्या मुळ गाव मानसामध्ये काल हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवालाची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग होती. त्यानं तयार केलेल्या गाण्यांवर जगभरातील तरुणाई थिरकायची. काल अचानक त्याच्या हत्येची बातमी ऐकणं हा त्याच्या चाहत्यांसाठी धक्का होता. सिद्धूचे एका गँगशी कथित रित्या संबंध होते, त्यामुळेच विरोधी गँगने त्याचा खून केला असल्याचं प्राथमिक दृष्ट्या सांगण्यात येतंय. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बरार ही दोन मोठी नावं समोर आली आहे.

टुपाक (Tupac Shakur)

Tupac Shakur
Tupac ShakurTeam Lokshahi

1996 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी टुपाकला सिग्नलवर असताना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. रॅपर टुपाकला हल्लेखोरांनी 4 गोळ्या घातल्या, यावेळी तुपॅकचा जागीच मृत्यू झाला. तुपॅकचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते असून, आजही त्याला ऐकणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे भारतातील अनेक रॅपरच्या गुरुस्थानी टुपाक आहे. यामध्ये सिद्धू मुसेवालाचं देखील नाव होतं.

यंग डोल्फ (Young Dolph)

Young Dolph
Young DolphTeam Lokshahi

17 नोव्हेंबर 2021 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी मेम्फिस, टेनेसी येथे झालेल्या गोळीबारात यंग डोल्फचा मृत्यू झाला. गावात असताना आपल्या आईसाठी बेकरीमधून कुकीज घेत असताना त्याच्यावर हल्ला झाला होता. शवविच्छेदनात उघड झालं की त्याच्यावर तब्बल 22 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

नटोरीयस बी. आय. जी (Notorious B.I.G)

Notorious B.I.G
Notorious B.I.GTeam Lokshahi

1997 मध्ये एका हल्लेखोराने Notorious B.I.G या रॅपरवर गोळीबार केला तेव्हा त्याची गाडी सुद्धा सिग्नलवर उभी होती. त्याच्या शवविच्छेदनाचा अहवान त्याच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये असं दिसून आलं की गोळीबारातील शेवटच्या गोळीनं त्याचा मृत्यू झाला.

XXXTentacion

XXXTentacion
XXXTentacionTeam Lokshahi

XXXTentacion ची वयाच्या 20 व्या वर्षी हत्या झाली. 18 जून 2018 रोजी फ्लोरिडा येथील डीअरफिल्ड बीच येथे मोटारसायकल डीलरशीपजवळ त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पैशांची बॅग चोरून घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com