अजित पवार यांच्याविरोधात सख्खा भाऊ श्रीनिवास पवार मैदानात

अजित पवार यांच्याविरोधात सख्खा भाऊ श्रीनिवास पवार मैदानात

श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर टीका केली आहे. श्रीनिवास पवार म्हणाले की, मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगल्या काळातही, वाईट काळातही. जे काही निर्णय त्यांनी घेतलं त्याला मी नेहमी साथ दिली. साहेबांचे वय आता 83 झाल्यामुळे त्यांना सोडणं मला काही पटलं नाही. माझे काही मित्र पण मला म्हणाले. आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची नाहीत. तो विचारच मला वेदना देऊन गेला.

जी काही पदं मिळाली ती केवळ साहेबांमुळे मिळाली. आणि त्याच साहेबांना आता म्हणायचं आपण कीर्तन करा, घरी बसा. हे माझ्या मनाला पटण्यासारखे नाही. मी जरा वेगळा माणूस आहे. मी काही राजकारणी नाही आहे. मला जे पटत नाही ते मी करत नाही.

काही नात्यांची एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालच राहायचं. वाईट वाटून घ्यायचं नसतं. मला दबुन जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. ज्या साहेबांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केलं. पंचवीस वर्षे मंत्री केलं. तरीसुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं? असे काका मला मिळाले असते तर मी पण खुश झालो असतो. वय वाढलं म्हणून वयस्कर माणसांना तुम्ही कमजोर समजू नका. असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com