कल्याणमधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी घोषित

कल्याणमधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी घोषित

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वज राजकीय पक्ष तयारीला लागले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले होते. याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे कल्याणमधलं शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तसेच पुढे फडणवीस म्हणाले की, पूर्ण ताकदीने मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळं त्याठिकाणी निवडून आणू. असे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com