डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महायुतीचा मेळावा; श्रीकांत शिंदेंनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेवर साधला निशाणा
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण, आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार राजेश मोरे, उपस्थित होते, डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार दीपेश म्हात्रे, आणि कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
"हायुतीने गेल्या काही वर्षांत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, रस्ते रुंदीकरण, मेट्रो, नवीन हॉस्पिटल आणि सुतिका गृहाची उभारणी ही महायुतीच्या सरकारमुळेच शक्य झाली आहे," असे शिंदे म्हणाले, या वेळी महायुती कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले, “मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता, आता विधानसभेतही हाच विजयाचा वारसा कायम ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहोचा,” असे शिंदे म्हणाले, राजेश मोरे यांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “राजेश मोरे हे एक सामान्य कार्यकर्ता असून त्यांनी लोकांची निस्वार्थ सेवा केली आहे, ते सतत जनतेसाठी उपलब्ध आहेत, म्हणूनच त्यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे.”कल्याण ग्रामीणमध्ये केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करताना शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले, "कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी विकासाच्या मोठ्या कामांची पूर्तता झाली असून, अनेक नव्या योजनांचा लाभही दिला गेला आहे, विरोधकांनी कल्याण ग्रामीण बदलते असा जाहीर फलक लावून आमच्या कामाचे कौतुक केले आहे," त्याचे आभार असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मनसे उमेदवार राजू पाटील यांच्यावर टीका केली आहे,