धक्कादायक; मेळघाटात आरोग्य विभागात तब्बल १५१पदे रिक्त; आरोग्य मंत्री तानाजी सावंत लक्ष देणार का?
Admin

धक्कादायक; मेळघाटात आरोग्य विभागात तब्बल १५१पदे रिक्त; आरोग्य मंत्री तानाजी सावंत लक्ष देणार का?

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी भाग सातत्याने कुपोषण व गर्भवती माता मृत्यूने चर्चेत राहतं
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी भाग सातत्याने कुपोषण व गर्भवती माता मृत्यूने चर्चेत राहतं. मेळघाटातील आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचं वास्तव पुढं आलं आहे,मेळघाटात आरोग्य विभागात एकूण ६७३ पदे आहेत.

मात्र यांतील तब्बल १५१ पदे रिक्त आहे तर यातील १९ पदे ही डॉक्टरांची रिक्त आहे.त्यामुळे मेळघाटातील कुपोषण कसं रोखणार हा सवाल यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे तर मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज पासून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत दोन दिवस मेळघाटच्या दौऱ्यावर आहे

त्यामुळे मेळघाटात आरोग्य विभागाची भरती ते करणार का ? व इथली आरोग्य यंत्रणा मजबूत करणार का? आरोग्यमंत्र्याच्या दौऱ्याने मेळघाटातील कुपोषण संपणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेळघाटातील रिक्त पद

मेडिकल ऑफिसर गट अ 1- मंजूर 14,रिक्त 5

मेडिकल ऑफिसर गट ब मंजूर 28,रिक्त -14

आरोग्य सहायक मंजूर 22,रिक्त -11

आरोग्य सहायिका मंजूर 17,रिक्त -9

आरोग्य सेविका मंजूर 111,रिक्त 28

आरोग्य सेवक मंजूर 78,रिक्त -23

औषधी निर्माता मंजूर 18,रिक्त 4

अधपरिचालिका - मंजूर90,रिक्त -38

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com