Amway ला झटका, ईडीकडून मोठी कारवाई
ईडीने अॅमवे इंडिया या मल्टी लेव्हल मार्केटिंग ( multi-level marketing, एमएलएम ) कंपनीला मोठा धक्का दिला आहे. या कंपनीच्या 757 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. याची माहिती ईडीनं जारी केली आहे.
अॅमवे कंपनीची एकूण मुंबईतील बँक व्यवहारासह 757 कोटी 77 लाख रुपयांची कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून 36 बँक खात्यांतील 345.94 कोटी रुपये जप्त केले आहेत.
या कंपनीकडून ग्राहकाला उत्पादनांची थेट विक्री केल्यास मिळणाऱ्या चांगल्या कमिशनवर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवलं जात होते. या कमिशनमुळे बाजारातील स्पर्धक उत्पादनांपेक्षा कंपनीच्या किंमती जास्त आहेत. यावर केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण (थेट विक्री) 2021 नियमांतर्गत अशा विक्रीवर बंदी घातली आहे.
या कंपनीची तमिळनाडूतील प्लांट , मशिनरी , वाहने , बँक खाती आणि मुदत ठेवी, जमीन आणि कारखान्याची इमारत यांचा समावेश असल्याची माहिती तपास संस्थेने दिली आहे.
या कंपनीने 2002-03 ते 2021-22 यावर्षी व्यवसायातून 27 हजार 562 कोटी रुपये कमवले तर 7,588 कोटी रुपये कमिशनपोटी अमेरिकेतील एजंटांना दिले. असे ईडीने सांगितले असून या प्रकरणात आता तपास सुरु आहे.