shivsena
shivsena Team Lokshahi

Shivsena vs Eknath Shinde : डोंबिवलीत शिवसेना कार्यकर्ते व शिंदे समर्थक कार्यकर्त्ते आमने - सामने

एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत शिंदे समर्थकानी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशे , बँजो ,फटाक्यांची आतिषबाजीत डोंबिवली फडके रोड ते इंदिरा चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (cm eknath shinde ) झाल्यानंतर राजकीय वातावरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची महाराष्ट्र (maharashtra) राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत शिंदे समर्थकानी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशे , बँजो ,फटाक्यांची आतिषबाजीत डोंबिवली (dombiwali) फडके रोड ते इंदिरा चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीचा कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थकाचे काही पदाधिकारी इंदिरा चौक परिसरात असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी गेले

शिवसेना (shivsena) मध्यवर्ती कार्यालयत उभे असलेले शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत उद्धव ठाकरे आगे बढो चे घोषणा करत जल्लोष सुरू केला. मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यामुळे अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही व पोलिसांनी शिंदे समर्थकांना पुतळ्यास हार घालून बाजूला नेले तर दुसरीकडे शिवसेना शाखेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना शांत केले .

shivsena
Anandrao Adsul : शिवसेनेला अजून एक धक्का; शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com