ज्यांच्यावर विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंतचे आरोप त्यांना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही - संजय राऊत
संजय राऊतांनी आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत धक्कादायक माहिती दिली आहे. राहुळ शेवाळे यांनी सांगितले की, सुशांत आणि दिशा सालियान यांच्या फोनमध्ये काय बोलणं झालं होतं? तिचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून का घेतला? रिया चक्रवर्तीचा मोबाईल तपासला का, तिच्या मोबाईलमध्ये AU हा नंबर सेव्ह होता. त्यावर 44 फोन आले होते, AU ला अनन्या उद्धव असं सांगितलं आहे.पण बिहार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आदित्य आणि उद्धव ठाकरे असं नाव समोर आलं होतं.
याच पार्श्वभूमीवर राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आमच्यावर कितीही आरोप करा, माणसं फोडो, माणसं फोडा शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाही. मागे हटणार नाही. जे हा खेळ करतायेत त्यांचं राज्य औटघटकेच आहे. असे संजय राऊत म्हणाले.
यासोबतच राऊत म्हणाले की, नागपूरच्या अधिवेशनात सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत, त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरु आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप सुरु आहेत. ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंतचे आरोप आहेत, अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या स्तरावर गेलेत हे दिसून येत आहे. असे राऊत म्हणाले.