Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

Sanjay Raut ED Inquiry : दिल्लीतील ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे. राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी (shivsena) राऊत यांच्या घराच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

ईडीचे दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी आल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या परिसरात साखळी आणि लॉक लाऊन गेट बंद करण्यात आला आहे. तसेच ईडी कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. राऊत यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Sanjay Raut
Kirit Somaiya on Sanjay Raut: “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार"
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com