“…अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला; सामनातून टीकास्त्र
Admin

“…अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला; सामनातून टीकास्त्र

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही राहुल शेवाळेंवरील बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेत केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे -फडणवीस सरकारवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे.“या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांचीही नावे येऊ शकतात व संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते. असे खुलासे झाले तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबडय़ांवर उभे आहेच, पण ते व्यभिचार व देशद्रोह्यांच्या पायावरही टिकले आहे.” असे सामनातून म्हटले आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे आचरण स्वच्छ असावे. खासकरून जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च संसदीय सभागृहाची सदस्य आहे अशा व्यक्तीकडून ही अपेक्षा आहे. याचबरोबर “फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडी-एनआयएने ठेवला व त्यांना अटक केली. त्यापेक्षा गंभीर प्रकरण संसदेचे सदस्य शेवाळे यांचे दिसते. दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी या खासदारांचे संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते. संबंधित महिलेसोबत संसद सदस्याचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते व ते वर्णन ‘रोमॅण्टिक’ अशाच शब्दात करावे लागेल. संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व मी तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनी सांगणे हा खोटारडेपणा आहे. मुळात अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद असलेल्या महिलेच्या प्रेमात खासदार अडकले. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या खासदाराने त्या महिलेला पुरवली काय? हनी ट्रपमध्ये खासदार अडकले आहेत व संबंधित महिलेच्या विरोधात आपण कोठे व कशा तक्रारी केल्या याबाबत त्यांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे, असे म्हणत सामनातून हल्लाबोल केला आहे.

यासोबतच सामनातून म्हटले आहे की, “दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत. शेवाळे यांचा हा दावा खरा नाही. संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे. येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे? बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही.” अशा शब्दात इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com