'या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील; शिवसेनेच्या अग्रलेखातून शिंदे गटावर टीका
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपा आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार शिवेसनेचं अस्तित्त्व संपवण्यासाठी हे सगळं करत आहेत,खोकेबाज मिध्यांवर लोकं थुंकतात, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले गेले आहे. भाजप नामर्द आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंना दफन करायलं हवं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेनं कायमचं गाडलं, असं त्यांच्या थडग्यांवर लिहायला हवं, असंही अग्रलेखात म्हटलंय. या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील, अशी जोरदार टीका शिवसेनेनं शिंदे गटावर केली आहे.
शिंदे गटाच्या मुखवट्यामागे भ्रष्ट आणि बेइमान गेंड्याची कातडी असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. इतकंच काय तर, ही बाळासाहेबांच्या नव्हे तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद आहे. मंत्रीपदाचं गाजर दिसलं म्हणून केसरकर मिंधे गटात गेलेत. केसरकर कधी कुणाचे होऊ शकले नाहीत. अनेक पक्षांत फिरुन हे महाशय शिवसेनेत आले होते. अशा शब्दात शिवसेनेनं दिपक केसरकर यांना सुनावले आहे. तसेच निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रक्क्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही. भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा | मिळवायचा आहे. आम्ही सांगितले, 'मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळविण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख, अरुणाचल प्रदेशातील जमिनीवर ताबा मिळवा. आम्ही सांगितले, 'मुंबई देशाचे पोट व तिजोरी भरतच आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा. तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही, जनतेचे विराट सैन्य आमच्या पाठीशी आहे. पण त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत झालीच नाही. असे सामनातून म्हटले गेले आहे.
यासोबतच याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले, राज ठाकरे यांनीही त्याचा मार्ग त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दात टीका केली पण ज्या शिवसेनेचा जन्मप्रव्होधनकार ठाकरे यांच्या आशिर्वादातुन झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस 'शिवसेना' हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अथम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही. शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप महाराष्ट्राच्या घराघरांतून व्यक्त होत आहे. अशा शब्दांत जोरदार हल्लाबोल सामनातून शिंदे गटावर करण्यात आला आहे.