जर तुमचे कारनामे मी बाहेर काढले तर ५० वर्ष जेलबाहेर येणार नाही' संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी नारायण राणे या महोत्सवाच्या व्यासपीठावरत बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे. तसेच मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे.
तसेच प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते. हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले. ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय. असे नारायण राणे राऊतांना म्हणाले.
यावर प्रतिउत्तर देत संजय राऊत म्हणाले की, "मी पक्षासाठी जेलमध्ये गेलो, तुमच्या सारखा पळून गेलो नाही, तुमच्या हातात न्यायालयाने कायदा दिला आहे का, मला जेलमध्ये कसे घालणार?"मी अजुन नारायण राणे यांच्याबद्दल काही बोललो नाही, नारायण राणेंसारखे इडीच्या नोटीसा येताच पळून जाणारे आम्ही नाही. पण जर धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजुला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो. माझ्या नादाला लागू नका, जर तुमचे कारनामे बाहेर काढले तर ५० वर्ष बाहेर येणार नाही,"असे म्हणत राऊत यांनी नारायण राणेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.