Gyanvapi
Gyanvapi Team Lokshahi

फ्रान्स राफेल बनवून आम्हाला विकतो अन् 130 कोटीचा देश थडग्यांचं उत्खनन करतोय - शिवसेना

शिवसेनेने सामनामधून ज्ञानवापी मशिदीवच्या वादावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून (Gyanvapi Controversy) शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. 'सामना' या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या संपादकीयातून शिवसेनेने (Shiv Sena) या मुद्द्यांवरूनच भाजप 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, पक्षाने भारताची तुलना फ्रान्सशी केली आहे आणि काशी-मथुरा मुद्द्यावरून काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांच्या 'दडपशाही'चा मुद्दा उपस्थित केला आहे.

Gyanvapi
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी 6 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येताच म्हणाली मला...

सामनाच्या हिंदी अवृत्तीमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या संपादकीयानुसार, '60 कोटी लोकसंख्येचा देश फ्रान्स आपल्याला 'राफेल' बनवून विकतोय आणि 130 कोटी लोकसंख्येचा देश दररोज मंदिर-मशिदी आणि अवशेषांचे उत्खनन करत आहे. काही लोक यालाच विकास मानत असतील तर त्यांना साष्टांग दंडवत. तसंच यावेळी शिवसेनेने काशी-मथुरा, ताजमहाल, जामा मशिदींबाबतच्या बातम्यांचाही उल्लेख केला.

"भाजपचे विकासाचे मॉडेल असेच सुरू आहे. हनुमान चालीसा, भोंगा भाग फारसा गाजला नाही. प्रत्येक वेळी नवीन रामकथा किंवा कृष्ण कथा तयार होते. मूळ रामायण-महाभारताशी त्याचा काहीही संबंध नाही. पण लोकांना चिथावणी देत ​​राहणे, असा भाजपचा धंदा सुरू आहे.

Gyanvapi
ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. पक्षाने मुखपत्रात म्हटलंय की, "अयोध्या एक झांकी आहे, काशी-मथुरा बाकी है" या घोषणेने हिंदुत्ववाद्यांना आनंद तर मिळणार आहेच, पण काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांवर पुन्हा दडपशाही सुरू झाली आहे, हा मुद्दा काशीइतकाच गंभीर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com