व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या ३९ आमदारांविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचा दुसरा मोठा विजय झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा पराभव केला. आकड्यांच्या खेळात भाजप आणि शिंदे गट आधीच मजबूत असला तरी या विजयाचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या अडचणीत झपाट्याने वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव यांनी शिंदे गटाशी तडजोड केली नाही तर पक्षही त्यांच्या हातातून जाऊ शकतो. त्यानंतर आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
व्हिपविरोधात मतदान केल्यानं शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना या मुद्दयावरुन ३९ आमदारांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी राजन पाडवी यांना मतदान करण्याचं ठरलं होतं, मात्र शिवसेनेच्या ३९ सदस्यांनी मतदान केलं नाही. त्यामुळे घटनेच्या तरतुदींनुसार कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.