Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजीनाट्य; सोहळ्यातून सुनील तटकरे निघाले तडकाफडकी
रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्यावेळी मात्र नाराजीनाट्य पाहायला मिळाले. ते म्हणजे सोहळ्यातून सुनील तटकरे तडकाफडकी निघाले. या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी बोलण्याची संधी दिली नाही. तसेच महापूजेचा सन्मान वारकऱ्यांना दिला नाही. कार्यक्रमातील अनेक त्रुटींमुळे सुनील तटकरे नाराज होऊन निघून गेले. आमदार अनिकेत तटकरेंसह सुनील तटकरे कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले.
यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, या कार्यक्रमात मी एक शिवप्रेमी नागरिक म्हणून उपस्थित होतो. राज्यशिष्टाचाराचे नियम पाळले गेले नाही. राज्य सरकारच्यावतीने होणार कार्यक्रम हा व्यक्तीगत असू शकत नाही. या कार्यक्रमात त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर मला ही माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या मात्र ते दिलं नाही. त्यामुळे कार्यक्रमातून थांबणं पसंत केलं. असं सुनील तटकरे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली आहे.