Shivjayanti 2023 : शिवभक्तांना राज्य सरकारकडून दिलासा, शिवजयंतीला शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी
Admin

Shivjayanti 2023 : शिवभक्तांना राज्य सरकारकडून दिलासा, शिवजयंतीला शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी

शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com