Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा खूप मोठं खिंडार, गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा खूप मोठं खिंडार, गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील

कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडल्याचं दिसून येतय. शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण आहे .ठाणे नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमधील अनेक नगरसेवक , पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडल्याचं दिसून येतय. शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण आहे .ठाणे नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमधील अनेक नगरसेवक , पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहे. त्यानंतर आता कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे (Gopal Landge ) देखील आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत .

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली होती. मात्र अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपाकडे सध्या हा मतदार संघ असला तरी सेनेची ताकद देखील या मतदार संघात आहे. आता भाजपा आणि शिंदे समर्थकांची ताकद येथे वाढल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, विशाल पावशे, प्रशांत काळे, दीपेश म्हात्रे यांसह 40 हुन अधिक माजी नगरसेवकानी मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. तर उल्हासनगरचे माजी नगरसेवक कलवंत सिंह आणि माजी नगरसेवक अरुण आशन यांनी देखील शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे समर्थकांची ताकद वाढली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे लांडगे यांनी सांगितले. दरम्यान कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला हा धक्का असल्याचे बोलले जात आहे .

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा खूप मोठं खिंडार, गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील
Balasaheb Thorat : पेट्रोल डिझेलची दर कपात करताना वीज २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com