eknath shinde | BJP | Devendra Fadnavis
eknath shinde | BJP | Devendra Fadnavisteam lokshahi

शिंदे गटाची वाटचाल भाजपाच्या दिशेने?

राज्यातील सत्तानाट्या नंतर वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होणं पसंत केले. तब्बल एका वर्षानंतर खासदार भावना ह्या वाशिम जिल्ह्यात आल्या आहे,आणि आज 20 ते तीस हजार कार्यकर्ते घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गोपाल व्यास, वाशिम

राज्यातील सत्तानाट्या नंतर वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होणं पसंत केले. तब्बल एका वर्षानंतर खासदार भावना ह्या वाशिम जिल्ह्यात आल्या आहे, आणि आज 20 ते तीस हजार कार्यकर्ते घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. शक्तिप्रदर्शन होताच वाटाणे लॉन मध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. वाशिम मध्ये होऊ घातलेल्या शिंदे गटाच्या या मेळाव्यास भाजपचे नेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे, हे प्रमुख मार्गदर्शक होते.

वाशिम शहरात या मेळाव्याच्या प्रचारासाठी शहरात लावलेल्या ठिकठिकाणी बॅनर वर शिवसेनेचे कमी अन भाजपच्याच नेत्यांचे फोटो जास्त झळकल्याने शिंदे गट भाजपच्या वाटेवर आहे का? अशी चर्चा सध्या वाशिम जिल्ह्यात रंगली होती. मात्र भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटनी यांची अनुपस्थित बरंच काही सांगून गेली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बुलढाण्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करतील त्यांच्याकडे कुणीही शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य केले होते. हे विशेष. वाशिम मध्ये होऊ घातलेल्या शिंदे गटाच्या या मेळाव्यास भाजपचे नेते प्रवीण दरेकर, खासदार शिकांत शिंदे, वाशिमचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, यांचे फोटो देखील बॅनर वर लावण्यात आले आहेत मात्र या बॅनर वर भावना गवळी वगळता वाशिम जिल्ह्यातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा फोटो नव्हता.

eknath shinde | BJP | Devendra Fadnavis
राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ : सुधीर मुनगंटीवार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com