कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव शिंदे गटच करणार
अमजद खान | कल्याण: कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळाली आहे. ठाकरे गटाला हा मोठा झटका आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करत परवानगी मागितली होती जिल्हा अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर. आम्ही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. तर या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढच्या पाऊल उचलणार असल्याचे ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले आहे.
कल्याणचा दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. दुर्गाडी किल्ल्यावर ५४ वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यंदा मात्र या उत्सवावर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट वादाचं सावट होतं . जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही अर्जांवर फैसला सुनावला .यंदाचे दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे .
याबाबत उद्धव ठाकरे गटातील कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले आहे ,परवनगी बाबत स्पष्टीकरण देण्यात आलेला नाही या निर्णयाबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढू असा बासरे यांनी स्पष्ट केले तर शिंदे गटातील कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असून आता दिवस कमी उरले त्यामुळे यंदा नवरात्रीचा उत्सव जल्लोषात करणार असल्याचे सांगितले