Shinde Government Anniversary: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण

Shinde Government Anniversary: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण

20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतला निघाले. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. 29 जून रोजी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार गुवाहाटीवरून गोव्याकडे गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण होतंय. गेल्या वर्षी 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीसांनी मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com