'सीएम व्हायचं असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं' शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'सीएम व्हायचं असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं' शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मविआने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मविआत कोणीही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असणार नाही. तर तीन्ही प्रमुख घटक पक्ष हे एकसमान असणार आहेत. 85-85-85 असा हा फॉर्म्युला असणार आहे.
Published by :
shweta walge
Published on

मविआने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मविआत कोणीही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असणार नाही. तर तीन्ही प्रमुख घटक पक्ष हे एकसमान असणार आहेत. 85-85-85 असा हा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजेच या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना समसमान जागांचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच उर्वरित जागा या छोट्या मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत. यावरुनच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्या शीतल म्हात्रें यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, हे कुठून फॉर्म भरणार आहेत का? की नेहमी सारखा पाठच्याच दारातून येणार, जर लोकांच्या मनातला मुख्यमंत्री व्हायचा असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं फेसबुक लाईक करून कोणी मुख्यमंत्री होत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, नवीन फॉर्म्युला महाभकास आघाडीने आणला आहे. 85 85 85 खर तर हे 270 असे बोलणारे जयंत पाटील यांचे गणित आहे. पण ज्या उभाटाने 146 जागांसाठी भाजप सोबतची युती तोडली त्यांना आज 85 जागा मिळत आहे कौतुक आहे.

युतीमध्ये यांना 2019 ला 124 जागा मिळाल्या आता त्यांना 85 जागा मिळाल्या आहे आणि महाविकास आघाडीने त्यांना खरा न्याय दिला आहे. यापुढे ते महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीच नाही तर बहुतेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील होऊ शकतील एवढ्या त्यांना जागा मिळालेल्या आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

आता 85 जागा लढून विश्र्वप्रवाक्ते मिळून संजय राऊत 100 जागा जिंकणार आहेत, त्यांच कॅल्क्युलेशन खूप भारी आहे. आणि ते आता कसे लढणार आहे आणि कसे जिंकणार आहे हे बघन आता गंमतीशी राहणार आहे.

यात मोठा गेम झाला आहे तो म्हणजे काँग्रेसचा, दुनियादारी चित्रपटाचा एक डायलॉग होता "श्रेया मोठा गेम झाला यार" सहा गेम झाला आहे काँग्रेसचा. सगळ्यात जास्त बघायला गेल तर आमदार काँग्रेसचे आहेत. फूट पडली आहे ती राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडले आहे याचा इम्पॅक्ट काँग्रेसवर झाला आहे.

लहानपणी कथा ऐकली होती दोन मांजरांच्या भांडणांमध्ये एक भोका एक लोण्याचा गोळा तराजूमध्ये समान वाटप करत होतं, शेवटी तो पूर्ण गोळा भोका मटकावतो यामध्ये बोका कोण आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे.

काँग्रेसने हा विचार करणं गरजेचं आहे. महाविकासमध्ये आमचा आलबेल आहे असं दाखवत आहे. परंतु नाना पटोले उद्धवजींचा एकेरी उल्लेख करत आहे. त्यानंतर संजय राऊत आणि नाना पटोले यांचा किती सत्य आहे हे आम्ही पाहत आहोत.

हे कुठून फॉर्म भरणार आहेत का की नेहमी सारखा पाठच्याच दारातून येणार, जर लोकांच्या मनातला मुख्यमंत्री व्हायचा असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं फेसबुक लाईक करून कोणी मुख्यमंत्री होत नाही. नाहीतर जनताच तुमच्या तोंडाला फेस कधीतरी आणून देईल, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com