Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात

देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी शेअर बाजारात घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी शेअर बाजारात घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 30 शेअर्सपैकी 16 शेअर्समध्ये घसरण तर 14 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. त्याचसोबत निफ्टीमध्ये 50 शेअर्सपैकी 26 शेअर्स घसरले आहेत आणि 24 शेअर्स वाढलेले पाहायला मिळत आहेत. तसेच बॅंक निफ्टीमध्ये 12 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे, तर 8 शेअर्स घसरलेले पाहायला मिळत आहे.

व्यवहारात सेन्सेक्स 66.57 अंकांनी घसरुन 78,667 वर व्यवहार करत होता तर निफ्टीही सुमारे 70 अंकांनी घसरत 23,950 च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र, त्यानंतर निफ्टीही हिरव्या रंगात दिसला. बँक निफ्टी जवळपास 80 अंकांनी घसरला होता. मिडकॅप निर्देशांकही घसरत होता. कालच्या मोठ्या घसरणीनंतर निफ्टीवरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात दिसले. मेटल निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. तर याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसी बॅंक आणि एम अॅण्ड एम यांच्यावर होत आहे यांच्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com