अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली.
Published by :
shweta walge
Published on

काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. यावरचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'भेट गुप्त नव्हती' असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

आज शरद पवार सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय?

ते पुढे म्हणाले की, आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ तारखेला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ३० ते ४० वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीला धक्का, जयंत पाटीलांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस

अजित पवार तुमचे पुतणे आहेत तर मग भेट गुप्त का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले बैठक गुप्त नव्हती.. माझ्या घरी किंवा कुणाच्या घरी भेट झाली तर वावगं काय? त्यावर पत्रकारांनी मनात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगितलं. मग पवार म्हणाले याचा अर्थ तुम्हाला उद्योग नाही. त्यानंतर एक हशा पिकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com