Sharad Pawar
Sharad Pawar

"ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि...", शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :
Naresh Shende
Published on

विरोधक सांगतात ही मोदींची गॅरंटी आहे. पण ही गॅरंटी टीकाऊ नाही. त्यांची गॅरंटी आता चालत नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्या लोकांनी आज देशासाठी काहीच केलं नाही. काही गोष्टी केल्या. त्या म्हणजे, सत्तेचा गैरवापर. ईडीचं नाव अनेक लोकांना माहित नव्हतं. ईडीच्या केसेस करतात. खोट्या केसेस करतात. अनेकांवर गुन्हे दाखल केले. माझ्यावरही गुन्हा दाखल केला. राज्य सहकारी बँकेत काही झालं म्हणून माझ्यावर केस केली. राज्य सहकारी बँकेचा मी सभासद नाही. मी त्या बँकेत कधी गेलो नाही, मी आयुष्यात कधी त्या बँकेकडून कर्ज घेतले नाही. मला ईडीच्या कार्यालयात बोलावलं. सर्व अधिकाऱ्यांनी हात जोडले आणि सांगितलं येऊ नका. आमच्याकडून चूक झाली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

पवार जनतेशी संवाद साधताना पुढे म्हणाले, मोदींच्या विचाऱ्याचा विरोधात जो वागतो, त्याच्या विरोधात जाण्यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येतो. दिल्लीचे तिनवेळा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल निवडून आले आहेत. गरिब कुटुंबातील साधा माणूस आहे. पण लोकांची त्यांच्याशी बांधिलकी वाढली. त्यांनी दिल्लीत शिक्षणाची उत्तम सुविधा दिली. दिल्लीचा विकास करुनही आज त्यांना तुरुंगात टाकलं. अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर त्यांना तुरुंगात टाकलं. झारखंडचा मुख्यमंत्र्यांनी रांची शहराचा विकास करण्याची केंद्रात निधी मागितला. पण सरकारने निधी दिला नाही.

त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आणि आज झारखंडचे मुख्यमंत्रीही तुरुंगात आहे. देशातील दोन राज्याचे मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत. सत्तेचा वापर लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी केला जातो. ही नरेंद्र मोदींची हुकूमशाही आहे. आज संसदीय लोकशाही आपण स्विकारली आहे. निवडुकांच्या निकालाच्या माध्यमातून त्यांच्या सत्तेचं सिंहासन आम्ही उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी काय भूमिका घेतली, काय केलं, याचा हिशोब घेण्याच्या संबंधीत ही निवडणूक आहे. दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत होते. त्यांचं भाषण ऐकलं, तर फक्त महागाईवरच बोलायचे. त्यांनी सांगितलं, माझ्या हातात सत्ता द्या. त्यावेळी पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. पण आता ३६५० दिवस झाले, ७१ रुपयांपरून पेट्रोलचा भाव १०६ रुपये झाला. मोदींनी या पद्धतीने महागाई कमी केलीय का, असा प्रश्न उपस्थित होतो.

घरात स्वयंपाकासाठी गॅस लागतो. २०१४ ला सिलेंडग गॅसची किंमत ४१० रुपये होती. मोदींनी ५० टक्के किंमत कमी करु असं आश्वासन दिलं होतं. पण आज सिलेंडरचा भाव ११६० रुपये झाला आहे. या देशात बेरोजगारी आहे, तरुणांना काम देणार असंही मोदींनी सांगितलं होतं. या जगात आएलओ (ILO) नावाची एक संस्था आहे. ते बेरोजगारीचा अभ्यास करतात. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्याचं त्यांच्या अहवालातून स्पष्ट झालंय, असंही शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com