ताज्या बातम्या
कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार? शरद पवारांनी सरळ सांगूनच टाकले
कर्नाटक निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.
कर्नाटक निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल यांच्यात लढत होत आहे. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्व पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार फोडून भाजपाने तिथे सरकार स्थापन केले. आता मध्य प्रदेशात निवडणुका झाल्यास परिस्थिती बदलू शकते. असे पवार म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, भाजपाकडे दुर्लक्ष करणे इतके सोपे राहणार नाही. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. तसेच, आता कर्नाटकातही काँग्रेसचा विजय निश्चित आहे. कर्नाटकात काँग्रेसला जिंकण्याची संधी आहे. असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.