Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

...तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंनी माफी मागितली होती; शरद पवारांनी दाखवला माफीनामा

छत्रपती शिवरायांच्या मातोश्रीबद्दल जेम्स लेनने लिहीलेल्या चुकीच्या लिखाणावर देखील शरद पवारांनी सविस्तर भाष्य केलं.
Published by :
Sudhir Kakde
Published on

जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी वेगवेळ्या मुद्दयांवर भाष्य केलं. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या लिखाणावरून निर्माण झालेल्या वादावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांनी जेम्स लेन याच्याबद्दलही भाष्य केलं. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज संकटावर (load shedding) बोलताना आज शरद पवार यांनी वीज प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता नसून, तो राष्ट्रीय प्रश्न आहे असं स्पष्ट केलं.

Sharad Pawar
सदावर्तेंना साताऱ्यानंतर पुणे पोलीस ताब्यात घेणार? वाचा काय आहे प्रकरण

शरद पवार यावेळी म्हणाले की, जेम्स लेनने छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाबाईंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं. त्या पुस्तकातील उतारा यावेळी शरद पवारांनी वाचून दाखवला."शहाजी राजे हे बाहेर राहत होते. शिवछत्रपती व जिजामाता हे शिवनेरीवर राहत होते, त्यांच्या समवेत, दादाजी कोंडदेव त्यांच्यासोबत कायम असत" असं म्हणत चुकीचा इतिहास जेम्स लेनने लिहील्याचं शरद पवार यांनी सांगितलं. त्याच जेम्स लेनबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरमध्ये गौरवोद्गार काढले होते. त्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण झाली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दलच्या वादावर देखील एकदा पुरंदरेंना ५ फेब्रुवारी २००१ ला माफी मागावी लागली होती, तो माफीनामा देखील शरद पवार यांनी यावेळी सर्वांसमोर ठेवला.

Sharad Pawar
"दिलासा घोटाळ्यात जामीन मिळालेल्या सोमय्यांना तुरुंगात जावं लागणार"

तसंच वीज प्रश्नावर बोलताना ते म्हणले की, आज संबंध हिंदुस्तानात वीज टंचाई आहे. कोळशासंबंधीत काही अडचणींमुळे सर्वसामान्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. भाजपशासित राज्यात देखील अशीच परिस्थिती आहे. राज्यातील राज्यकर्ते याबद्दल गांभीर्यानं विचार करत आहेत असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com