शरद पवार हे गौतम अदानी यांच्या भेटीला? चर्चांना पुन्हा उधाण!

शरद पवार हे गौतम अदानी यांच्या भेटीला? चर्चांना पुन्हा उधाण!

शरद पवार आणि गौतम अदानी यांची पुन्हा एकदा आज अहमदाबादमध्ये भेट झाली आहे, या भेटीमागे नेमकं काय कारण असेल ही चर्चा सुरु आहे, मात्र या भेटीमागे वेगळंच कारण आहे.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील घरी दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळं अनेक चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी शरद पवार गौतम अदानी यांच्या घरी जावून भेट घेत आहेत हे अद्यप अस्पष्ट आहे. पण अदानींच्या घरी असलेल्या खासगी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी पवार गेले असल्याचं सांगितलं जात आहे.

गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्ग प्रकरणात चर्चेत आले होते, तेव्हा ही भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती, यात त्यांची अर्धातास चर्चा झाली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र गौतम अदानी यांना सतत निशाण्यावर ठेवून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागणे सुरुच ठेवले आहे. पण शरद पवार आणि गौतम अदानी यांची पहिली भेट झाली तेव्हा या भेटीवर अनेक तर्क काढण्यात आले होते, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील झाली. पण आजची भेट ही गौतम अदानी यांच्या एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार यांनी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com