Sangali
SangaliTeam Lokshahi

त्या काळातही शरद पवार यांनी मणिपुर मध्ये अडकेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केली मदत

मणिपुर येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली.
Published by :
shweta walge
Published on

संजय देसाई, सांगली; मणिपुर येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली. पवार यांच्या तत्परतेमुळे मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीने संरक्षण पुरवत सुरक्षित स्थळी हलविले. संबंधित विद्यार्थ्याच्या वडीलांनी ओळखीतून बारामतीच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली होती. त्यानंतर ही सुत्रे हलविण्यात आली. मळद (ता. बारामती) येथील ऑरगॅनीक अॅन्ड रेस्युड्यू फ्री फार्मर्सअसोसिएशन (मोर्फा) सचिव प्रल्हाद वरे यांना गुरुवारी सायंकाळी वाजता मोर्फाचे सभासद संभाजी कोड (रा. आवंढि, ता. जत, जि. सांगली) यांचा फोन आला. त्यांनी त्यांचा मुलगा 'आयआयआयटी' इन्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तो त्याचे महाराष्ट्रातील दहा, इतर राज्यातील दोन असे बारा मित्रांसह होस्टेलमध्ये आहे. होस्टेल शेजारी तसेचठिकठिकाणी दंगल मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या भयंकर परिस्थितीत काहीही करा, पंरतु माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी कोडग यांनी केली.

त्यावर वरे यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. नंतर वरे यांनी त्यांना पवार यांचे स्वीय सहायक राऊत यांचा मोबाईल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांना संबंधित मुलांना आलेली अडचण सांगितली. तेव्हा ज्येष्ठ नेते पवार यांनी मणिपूरचे राज्यपालाना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले. त्यानंतर रात्री बारा वाजता मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयुर कोडग यासं संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवकरच येत असल्याचे कळविले. तसे त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी शरद पवारांची मनधरणी करायला सुरुवात केली होती. हा सगळा गदारोळ राष्ट्रवादीमध्ये सुरू असतानाच शरद पवार यांनी सिल्वर ओक वरून अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूत्रे फिरवली. यामुळे या पालकांनी शरद पवार यांचे आभार मानलेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com