Supriya Sule : या बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईचे हे जे सरकार आहे, त्याला हद्दपार करायची वेळ आलेली आहे

Supriya Sule : या बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईचे हे जे सरकार आहे, त्याला हद्दपार करायची वेळ आलेली आहे

वीज दरवाढी विरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वीज दरवाढी विरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचे पाप या सरकारने केलेलं आहे. पण विजेचा दर वाढलेला आहे तसे आपल्या घरातील जेष्ठ नागरिक जे औषधे घेतात त्या औषधांचा देखील भाव वाढलेला आहे. अगदी दुर्दैवी आहे. या बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईचे हे जे सरकार आहे. त्याला हद्दपार करायची वेळ आलेली आहे.

आमची वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही. ही लोकशाही आहे की दडपशाही आहे? या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया आघाडी आता रस्त्यावर उतरली आहे. हम लढेंगे और जितेंगे. लोकांना सांगितले जाते तुमच्यावर केसेस होती. आम्ही केसेसला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. कारण आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक लढलेलो आहोत.

पण दडपशाहीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ताकदीने उतरलो आहोत. सत्ता आणि पैशांचा जो गैरवापर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार करत आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com